बेळगावकरांच्या चरणी सायंदैनिकाची सेवा

नमस्कार ,
प्रिय वाचकहो

स्मार्ट सिटी कडे वाटचाल करू पाहणारे आपलं बेळगाव आता नव्या स्मार्ट वळणावर येऊन ठेपलं आहे . आपलं आवडतं शहर वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये आपला लौकिक सार्थ ठरवत आहे . कोरोनाच्या संकटांशी झुंजताना दैनंदिन जीवनमानाचे स्वरूप बदलण्याची वेळ येऊन ठेपली आहे .अशावेळी सर्वच क्षेत्रामध्ये बदलाचे वारे प्रचंड वेगाने वाहू लागले आहेत .त्यामुळेच सामान्य वाचकांच्या माध्यम निवडीत देखील बदल हा अपरिहार्य आहे. याच उद्देशाने माध्यम सेवेत नवा पैलू घेऊन बेळगावकरांसाठी आजपासून सायंदैनिक रुजू होत आहे. ताज्या घडामोडी वेळच्यावेळी वाचकांपर्यंत पोचवण्यासाठी होत असलेला हा अभिनव प्रयोग निश्‍चितच स्वीकारला जाईल .याबद्दल आम्हाला खात्री आहे.

आपल्या वाचकांसाठी ही सेवा प्रारंभी ईपेपर स्वरूपात उपलब्ध होत आहे.तसेच फेसबुक आणि युट्युब या माध्यमातून देखील या दैनिकातील बातम्या आणि घडामोडी वाचकांना अगदी तळहातावर पोचणार आहेत.बदलत्या काळाच्या मागणीनुसार उपलब्ध होणारी ही सेवा आपल्या हाती देताना आम्हाला अत्यानंद होत आहे.वाचकांच्या सेवेसाठी ही फक्त सुरुवात आहे …..

कळावे
आपला स्नेहांकित
उपेंद्र बाजीकर
7259145470

You cannot copy content of this page
error: Content is protected !!