एअर इंडिया वर आता टाटा समूहाची मालकी

नवी दिल्ली वृत्तसंस्था

गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत असलेल्या एअर इंडियाच्या मालकीच्या मुद्द्यावर आता पडदा पडला आहे. देशातील टाटा सन्सकडे पुन्हा एकदा एअर इंडियाची मालकी आली आहे. त्यामुळे एअर इंडियामधील दीर्घकाळ रखडलेली निर्गुंतवणुकीची प्रक्रिया अखेर संपुष्टात आली आहे. एअर इंडियावरील मालकी हक्कासाठी चार निविदा आल्या होत्या. त्यामध्ये टाटा सन्ससोबत स्पाइसजेटचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक अजय सिंग हे देखील स्पर्धेत होते. मात्र, शेवटी टाटा सन्सनं बाजी मारली असून आता एअर इंडियाची मालकी टाटा समूहाकडे गेल्याचं स्पष्ट झालं आहे.

केंद्रीय मंत्रिमंडळातील मंत्रीगटाने एअर इंडियाची मालकी टाटा सन्सकडे सोपवण्याच्या प्रस्तावाला मंजुर दिल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. टाटा सन्सने एअर इंडियासाठी सर्वाधिक बोली लावली होती. त्यामुळेच एअर इंडिया ६७ वर्षांनंतर पुन्हा एकदा टाटा सन्सकडे गेलं आहे. येत्या काही दिवसांमध्ये केद्रीय पातळीवरून निर्गुंतवणुकीची प्रक्रिया पूर्ण केली जाईल. असे कळविण्यात आले आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *