बेळगुंदी येथील गायरान जमिनीवरील अतिक्रमण रोखण्याची मागणी

बेळगाव : प्रतिनिधी
बेळगुंदी येथील गायरान जमिनीवर ताबा मिळवून त्यावर अतिक्रमण करण्याचा प्रयत्न काही मंडळी करत आहेत. सदर जमीन गायरान म्हणूनच राखीव ठेवावी, अशी मागणी बेळगुंदी ग्रामपंचायत, ग्रामस्थ पंचकमिटी आणि ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आली आहे. या मागणीसाठी ग्रामस्थांनी बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. तसेच आपल्या विविध मागण्यांचे निवेदन सादर केले. या निवेदनात म्हटले आहे की, सध्या राखीव असलेली सर्वे क्र. 300 मधील ही गायरान जमीन गावातील काही मंडळी ताब्यात घेण्याचा खटाटोप करीत आहेत. सदर जमीन ही सरकारी राखीव आहे. असे असताना काही जणांकडून अतिक्रमणाचा प्रयत्न होत आहे. त्यामुळे ग्रामस्थांसाठी समस्या उद्भवत आहेत. तसेच काही खोट्या खटल्यांमध्ये गुंतवून उपद्रव करीत आहेत. याची नोंद घेवून जिल्हाधिकार्‍यांनी सदर प्रकरणाची गंभीर दखल घ्यावी अशी मागणी करण्यात आली. निवेदन सादर करतेवेळी ग्रामस्थ प्रतिनिधी बहुसंख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *