सरकारचा धान्यसाठा लोकप्रतिनिधींच्या गोदामात

बेळगाव : प्रतिनिधी
केंद्र सरकारने बांधकाम मजूरांसाठी उपलब्ध करुन दिलेला धान्यसाठा खासदार आणि आमदारांनी आपल्या गोदामात ठेवला आहे. त्याची जबाबदारी जिल्हाधिकार्‍यांनी घ्यावी आणि सदर धान्यसाठा हा गरजू आणि गोरगरिब बांधकाम कामगारांसाठी वितरीत करुन द्यावा, अशी मागणी बांधकाम कामगारांच्यावतीने करण्यात आली आहे.

सरकारने आर्थिक दुर्बल घटकातील बांधकाम मजुरांसाठी किटच्या रूपाने या धान्याचे वितरण केले आहे परंतु हे किट वितरण करण्यासाठी आमदार आणि खासदारांनी आपल्या ताब्यात घेतले आहेत. याची व्यवस्था जिल्हाधिकाऱ्यांनी स्वतःच्या हातात घ्यावी अशी मागणी निवेदनात नमूद करण्यात आली आहे.

या मागणीचे निवेदन शुक्रवारी जिल्हाधिकार्‍यांच्या नावे देण्यात आले. निवेदन देतेवेळी अ‍ॅड. एन. आर. लातूर, अ‍ॅड. अण्णासाहेब घोरपडे आणि बांधकाम कामगारांचे प्रतिनिधी उपस्थित होते. गोरगरिब बांधकाम कामगारांच्या हितासाठी राबविलेल्या योजना त्यांच्यापर्यंत पोेचवाव्यात अशी मागणी निवेदनात मांडण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *