बेळगाव प्रतिनिधी
कोरोनाच्या नियंत्रणासाठी जिल्हा प्रशासनाकडून वीकेंड लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. त्याचा प्रारंभ शुक्रवारी सायंकाळपासून झाला. मात्र आता पोलिसांनी आपला प्रभाव आवरता घेतला आहे.त्यामुळे लॉकडाउनच्या कार्यवाहीचा जोर ओसरला असल्याचे चित्र दिसत आहे. त्यामुळे नागरिकांना दिलासा मिळाला आहे. मागील सुमारे दोन महिन्यापासून शहरवासीयांनी लॉकडाउनच्या कठोर नियमांचा सामना केला होता. त्यानंतर अनलॉक ची प्रक्रिया सुरू झाली . त्यामध्ये नियमांमध्ये बदल बदल करण्यात आले. या बदलांना देखील बेळगावकर आता सामोरे जात आहेत. त्याप्रमाणे पोलिसांनी देखील नागरिकांना काही प्रमाणात मुभा दिली असल्यामुळे नागरिकांचा संचार सुरळीतपणे सुरू असल्याचे चित्र दिसत आहे.
सकाळी 6 ते दुपारी 2 दरम्यान जीवनावश्यक वस्तू खरेदीची सवलत होती. त्या वेळी नागरिकांनी आपले व्यवहार उरकून घेतले .मात्र दुपारनंतर शहरात शांतता पसरली होती फक्त नागरिकांचा किरकोळ संचार सुरू होता.