नियमांचे पालन करा.. पोलिसांचा आहे पहारा

बेळगाव प्रतिनिधी

मागील दोन महिन्यापासून सुरू असलेला कठोर लॉकडाऊन सोमवारपासून संपुष्टात आला आहे. त्यामुळे बाजारपेठेत उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे नागरिकांमधून आता खरेदीला बहर आला आहे. मात्र यासाठी वेळेची मर्यादा पाळण्याचे बंधन आहे सायंकाळी चार नंतर पोलिसांचा पहारा सुरू होत असून बाजारपेठेत व्यवहार बंद होत आहेत. यासाठी पोलिसांचे पथक संचार करताना दिसत आहे. नागरिकांना अनलॉक साठी देण्यात आलेल्या नियमांचे पालन करण्याचे आवाहन करण्यात येत आहे

दैनंदिन स्वरूपातील कामकाज आता सुरळीत सुरू झाल्याने व्यापारी वर्गाला आणि नागरिकांना दिलासा मिळाला आहे. प्रशासनाने दिलेल्या अनुमती नुसार सोमवारी सकाळी बाजारपेठेत नागरिकांचा संचार दैनंदिन स्वरूपात सुरू झाला आहे. कित्येक दिवस बंद राहिलेली दुकाने पुन्हा उघडल्यामुळे व्यापारीवर्ग आता आपले दैनंदिन व्यवहार पूर्ववत होण्याच्या प्रतीक्षेत आहे. बेळगाव शहराच्या मध्यवर्ती भागासह शहापूर टिळकवाडी , अनगोळ , वडगाव या भागातील व्यवहार पूर्वपदावर येत आहेत.

मात्र शहराच्या अनेक ठिकाणी होणारी गर्दी टाळावी,, तसेच नियमांचे पालन करावे यासाठी पोलिस यंत्रणा सज्ज आहे . शहर परिसरात सायंकाळी साडेचार नंतर पोलिसांचे पथक संचार करून नागरिकांना याची सूचना देत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *