अनलॉक थ्री प्रक्रिया सुरु ; मात्र दक्षता आवश्यक

बेंगलोर वृत्तसंस्था

राज्यातील कोरोना संसर्गाचे प्रमाण दिवसेंदिवस कमी होत असून, मृत्यूच्या प्रमाणातही मोठी घट होत आहे. यासाठी येत्या 5 जुलैपासून जारी करण्यात येणाऱ्या अनलॉक-3 ची प्रक्रिया सुरू करण्यात येत आहे .यासंदर्भात सरकारने मुख्यमंत्र्यांनी उच्चस्तरीय बैठक घेऊन या संदर्भातील आराखडा नियोजित केला आहे.

मागील दोन महिन्यांपासून सुरू असलेल्या लॉकडाउनच्या कालावधीमुळे अनेक व्यवहार ठप्प झाले होते. मागील दिनांक 21 जुलै पासून जूनपासून अनलॉक टू ची प्रक्रिया सुरू झाली होती. त्याचप्रमाणे टप्प्याटप्प्याने पुढील अनलॉक प्रक्रिया सुरू करण्याचे जाहीर करण्यात आले होते. आता दि. 5 जुलैपासून नागरिकांना संचारासाठी आणि दैनंदिन व्यवहारासाठी अधिक मुभा मिळणार आहे . मात्र कोरोना आणि डेल्टा प्लस यांचा वाढता धोका लक्षात घेऊन नागरिकांनी सतर्क राहण्याची गरज निर्माण झाली आहे.

आवश्यक वस्तूंच्या खरेदीची वेळ वाढवण्याबरोबरच रात्रीच्या संचार बंदीची वेळ कमी होणार आहे. सरकारने कोविड तांत्रिक सल्लागार समितीच्या सल्यानुसार लॉकडाउनमधील शिथिलता जाहीर केली आहे.
सध्या खरेदीची वेळ सायंकाळी 5 वाजेपर्यंत आहे. त्याचा कालावधी अधिक वाढविण्याचा प्रस्ताव आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *