बेळगाव : प्रतिनिधी
महापालिकेची अंतिम मतदार यादी शुक्रवारी जाहीर झाली. महापालिका
आयुक्तांनी ही माहिती दिली आहे. पण, मराठी मतदार यादी सोमवारी उपलब्ध होईल, असे सांगण्यात आले असून, 29 जूनपर्यंत आलेल्या आक्षेपांची नोंद घेण्यात आली आहे, अशी माहिती देऊन मराठी जनतेच्या तोंडाला पाने पुसल्याचे उघडकीस आणले आहे. महापालिका निवडणुकीसाठी निवडणूक आयोगाने दिलेल्या सूचनेनुसार मतदार यादी तयार करण्यात आली आहे. 28 जून रोजी कच्ची मतदार यादी तयार केली होती. त्यावर आक्षेप नोंदवण्यासाठी 1 जुलैपर्यंत मुदत होती. पण, या काळात मराठी मतदार यादी प्रसिद्ध केली नव्हती. त्यामुळे लोकांना माहिती घेताना अडचण झाली. आता मराठी मतदार यादी सोमवारी देण्यात येईल असे जाहीर करण्यात आले आहे.
मनपाची मराठी मतदार यादी सोमवारी मिळणार
