बांधकाम व्यावसायिकाच्या अपहरण नाट्याची सांगता

बेळगाव : प्रतिनिधीबेळगावातील एका प्रथितयश बांधकाम व्यावसायिकाचे अपहरण झाल्याची खळबळजनक घटना घडली. मात्र दुपारनंतर तो बांधकाम व्यावसायिक सुखरुप घरी परतल्यामुळे या अपहरण नाट्यावर पडदा पडला आहे. याप्रकरणी माळमारुती पोलीस स्थानकात तक्रार नोंदविण्यात आली आहे. माळमारुती देवस्थान येथून सकाळी मदनकुमार भैरप्पणावर असे या बांधकाम व्यावसायिकाचे नाव आहे. शनिवारी सकाळी माळमारुती देवस्थान येथे दर्शन घेऊन मदनकुमार हे घरी निघाले होते. त्यावेळी त्यांच्या इनोव्हा कारसह त्यांचे अपहरण करण्यात आले. त्यानंतर त्यांची कार पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर सोडून देण्यात आली. तेथून त्यांना होंडासिटी कारमधून पुढे नेण्यात आले. याप्रकरणी
 माळमारुती पोलिसात तक्रार नोंदविण्यात आली असून पुढील तपास सुरु करण्यात आला आहे. मदनकुमार यांनी बेळगावात अनेक ठिकाणी भव्य निवासी प्रकल्प उभे करून त्यांनी अल्पावधीत आपला लौकिक मिळविला आहे. त्यामुळे त्यांच्या अपहरणाचे वृत्त हाती आल्याने अवघ्या बांधकामविश्वात एकच खळबळ उडाली होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *