नियमावलीचे उल्लंघन केल्याप्रकरणी हाॅटेलवर कारवाई

बेळगाव प्रतिनिधी

हॉटेलमधून अन्नपदार्थांचे पार्सल देण्याचा नियम असतानाही टेबलावर ग्राहकांना जेवण देणाऱ्या हॉटेल चालकाच्या विरोधातही कारवाई करण्यात आली आहे. शहापूरातील मल्हार हाॅटेलवर कारवाई करण्यात आला आहे. हाॅटेल, धाबा तसेच खानावळी चालू ठेवण्यास परवानगी असली तरी फक्त पार्सल सेवेला मुभा आहे. पण हाॅटेलात लोकांना जेवण आसनावर बसवून देण्यात येत होते. त्यामुळे मालकासह ईतर 18 जणांवर कारवाई करण्यात आली आहे. याप्रकरणी मालक श्रीधर शंकर पाटील याच्यावर कर्नाटक संसर्गजन्य रोग निवारण कायद्यानुसार गुन्हा नोंदवण्यात आला.
कोरोनाचा संसर्ग थांबावा यासाठी जिल्हाधिकारी एम.जी . हिरेमठ यांनी जिल्ह्यामध्ये 21 जूनपर्यंत लॉकडाऊन आदेशांना वाढ देत असताना अजूनही निर्बंध घातलेले आहेत. त्यांचे पालन करण्याचे आवाहन करण्यात येत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *