कॅम्प विभागात बालिकेवर अत्याचाराची घटना

बेळगाव:  प्रतिनिधी

शहरातील कॅम्प भागात 3  वर्षीय लहान मुलीवर दोघा युवकांनी अत्याचार केल्याचा आरोप करण्यात आला आहे . कॅम्पच्या स्वामी बेकरी जवळील कसाई गल्लीतील एका  चिमुकलीवर बलात्कार झाल्याची संतापजनक घटना घडली आहे. दोघांनी या चिमुरडीवर अत्याचार केला असल्याची तक्रार नागरिकांनी केली. पोलिसांनी याप्रकरणी नराधम आरोपींना अटक केली आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली आहे. कॅम्प येथे तणावाचं वातावरण निर्माण झाले होते. त्यामुळे कॅम्प येथे मोठा पोलिस बंदोबस्त वाढविण्यात आला होता.

बेळगावातील कॅम्प भागातील अँटोनी स्ट्रीट येथे 10 दिवसांपूर्वी भाड्याने राहण्यासाठी आलेल्या 20 वर्षीय रोषन डेव्हिड नामक विद्यार्थ्याने अत्याचार केला. आरोपी हा पीडितेच्या घरा बाजुचा मुलगा आहे. या धक्कादायक प्रकारानंतर आरोपीला कठोर शिक्षा देण्यात यावी, अशी मागणी संबंधित परिसरातील नागरिकांकडून होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *