मुलाच्या अपघाताबाबत सवदी यांचे घुमजाव

“बेळगाव :

बागलकोट जिल्ह्यामध्ये मागील आठवड्यामध्ये झालेल्या एका अपघातात मुख्यमंत्री लक्ष्मण सवदी यांच्या मुलाने भरधाव वेगात गाडी चालवत एका बाईकला धडक दिली. यामध्ये एका शेतकऱ्याचा मृत्यू झाल्याने आता या मुद्द्यावरुन राज्यातील राजकारण चांगलच तापलं आहे. असं असतानाच आरोपीचे वडील आणि उपमुख्यमंत्री लक्ष्मण सवदी यांनी या प्रकरणामध्ये राजकीय हेतूने जाणूनबुजून आपल्या मुलाचं नाव गोवलं जात असल्याचा आरोप केला आहे.

पत्रकारांशी संवाद साधताना भाजपाचे नेते असणाऱ्या सवदी यांनी माझ्या मुलाला म्हणजेच चिदानंद सवदीला या प्रकरणामध्ये उगाच अडकवलं जात आहे. अपघात झाला तेव्हा माझा मुलगा गाडी चालवत नव्हता असं सवदी म्हणालेत. तसेच या घटनेचा राजकीय हेतूने वापर केला जात आहे. या मागे कोण आहे याचा मी नक्की शोध घेईन, असं सवदी यांनी म्हटलं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *