घरफोडीच्या दोन गुन्ह्यांचा पोलिसांनी छडा

बेळगाव :

शहापूर पोलिस स्थानकाच्या हद्दीत घरफोडीच्या दोन गुन्ह्यांचा पोलिसांनी छडा लावला असून एका युवकाला अटक केली आहे. त्याच्याकडून 70 ग्रॅम सोन्याचे दागिने जप्त केले आहे. वडगाव गुरुदेव गल्ली येथील 32 वर्षीय परशुराम ईरप्पा दंडगल याला शहापूर पोलिस स्थानकात हद्दीत संशयास्पदरित्या फिरताना अटक केली आहे.
या घटनेसंदर्भात पोलिसांनी आरोपीला अटक केली असून, यासाठी अंदाजे ₹ 3.36 लाख रुपयाचे 70 ग्रॅम सोन्याचे दागिने जप्त केले आहे. शहापूर पोलिस ठाण्याचे पीआय राघवेंद्र हवालदार, पीएसआय मंजुनाथ, एएसआय यूटी पाटील, एस.एम. कांबळे, एस. एस. उळ्ळागड्डी, अधिकारी व कर्मचार्‍यांच्या कामाचे पोलीस आयुक्तांनी कौतुक केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *