होनकल येथे अपघातात रेल्वे कर्मचारी जागीच ठार

खानापूर : प्रतिनिधी

कारच्या धडकेने दुचाकीस्वार ठार झाल्याची घटना खानापूर तालुक्यातील रामनगर-बेळगाव मार्गावरील होनकल येथे घडली आहे. या अपघातात लोंढा रेल्वेचा कर्मचारी मंजुनाथ एस. ईडीबी यांचा जागीच मृत्यू झाला आहे.

मंजुनाथ हे केए 22 / ईझेड 4511 क्रमांकाच्या दुचाकीवरून चालले होते. यावेळी टीएस 07 / जीटी 7837 क्रमांकाच्या होंडा सिटी कारशी त्यांच्या दुचाकीची टक्कर झाली. यामध्ये मंजुनाथ यांचा जागीच मृत्यू झाला. अपघातातील होंडा सिटी कार ही तेलंगणा येथील रंगनरेड्डी यांच्या मालकीची असल्याचे समजते. घटनेत मृत्यू झालेल्या मंजुनाथ यांच्या पश्चात एक मुलगा आणि पत्नी असा परिवार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *