सदाशिवनगर येथे घरफोडीचा प्रयत्न
बेळगाव प्रतिनिधी
शहर आणि परिसरात काही ठिकाणी चोरट्यांनी घरफोडीचे प्रकार सुरू ठेवले आहेत .त्यामुळे पोलिस यंत्रणेने अधिक दक्ष होण्याची गरज निर्माण झाली आहे. गुरुवारी सकाळी सदाशिवनगर येथे असाच घरफोडीचा प्रयत्न घडल्याचे निदर्शनास आले आहे. सदाशिवनगर शेवटचा स्टॉप ( आनंद अपार्टमेंटच्या मागील बाजूस) येथे असलेल्या घरांमध्ये चोरट्यांनी कुलूप तोडले . तसेच प्रवेशाचा प्रयत्न केला . मात्र तो अपयशी ठरला . सामाजिक कार्यकर्ते प्रसाद चौगुले यांच्या घरामध्ये असणाऱ्या भाडेकरूच्या घराचे कुलूप तोडण्यात आले आहे. चोरट्यांनी चोरीचा प्रयत्न अपयशी ठरल्यानंतर तिथून पलायन केले आहे. पोलीस यंत्रणेने याची गंभीर दखल घेण्याची मागणी होत आहे .तसेच या भागात गस्त वाढवावी अशी मागणी प्रसाद चौगुले यांनी केली आहे.