बेळगाव प्रतिनिधी
कंग्राळी बि. के. येथे चोरट्यांनी बंद घराचा दरवाजा तोडून किमती ऐवज लांबविला आहे. ही घटना बुधवारी सायंकाळी उघडकीस आली आहे . या घटनेमध्ये चोरट्यांनी सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह रोख रक्कम लांबवली आहे. यासंदर्भात घर मालक सूदर्शन नाईक यांनी तक्रार दिली आहे . नाईक हे आपल्या कुटुंबासमवेत गावाला गेले होते. बुधवारी ते परत आले असता त्यांना घराचा दरवाजा तोडण्यात आले असल्याचे लक्षात आले .त्यानंतर आत जाऊन पाहणी केली असता तिजोरी विखरून पडल्याचे दिसून आले . यामध्ये 20 ग्रॅम सोने व 30 ग्रॅम-चांदीचे दागिने आणि दहा हजार रुपये रोख रक्कम चोरट्यांनी लांबविली आहे . याप्रकरणी पोलिसात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.