गणेशोत्सवानिमित्त आमचा गणराया हे गाणे भक्तांच्या भेटीसाठी दाखल

बेळगाव प्रतिनिधी

खास गणेशोत्सवाच्या निमित्ताने बेळगावातील कलाकार समूहाने आमचा गणराया हे गाणे ही भक्तांच्या भेटीसाठी आणले आहे.  हे गाणे शनिवार पासून माणिक विंग्ज म्युझिक या यु टूब चॅनल वर प्रसारित होणार आहे.  इन्फिनिटी फिल्म्स प्रोडक्शन आणि माणिक विंग्स म्युझिक लेबल यांनी हे गाणे तयार केले आहे

या गाण्याच खास आकर्षण असं असणार आहे या गाण्याचे दिग्दर्शन विकास पांडुरंग पाटील म्हणजेच  अभिनेता लेखक जलवा यांनी केले आहे . गाण्याचे बोल आणि संगीत अनुप अरुण पवार यांनी केल आहे हे गाणे कमल गुलाब जैन यांनी  केले आहे या गाण्यामध्ये पडद्यावरील भूमिकांसाठी  अशोक फळदेसाई व विदुला चौगुले म्हणजेच जीव झाला येडा पिसा मधील शिवा आणि सिद्धी यांनी काम केल आहे.
तर या  गाण्यामध्ये 70 पेक्षा अधिक स्थानिक कलाकारांनी काम केल आहे .
तर या सर्वात सागर कांबळे, मनोज चौगुले, नागेश हिंडलगेकर ,चेतन भंडारी ,मंजुनाथ पाटील, दिनेश बेकवाडकर ,प्रदीप कांबोजी,  प्रसाद भट, शिवानी बस्तवाडकर , साक्षी पवार , राम लोहार,  प्रवीण मल्हार , विनायक निशांत,  मौसमी यांनी ही खूप मेहनत घेतली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *