श्री विसर्जनाला लागले लाठीमार आणि वादाचे गालबोट

बेळगाव : प्रतिनिधी

मागील दहा दिवसांपासून सुरू असलेल्या सार्वजनिक श्री गणेशोत्सवाची सांगता रविवारी झाली. या उत्सवाच्या निमित्ताने होणाऱ्या श्री विसर्जन मिरवणुकीला अनुमती देण्यात आली नव्हती. मात्र भक्तांच्या अमाप उत्साहामुळे मिरवणुकीचे स्वरूप प्राप्त झाले होते . श्री विसर्जनाचा सोहळा शांततेत पार पडला, तरी काही कारणांनी या सोहळ्याला गालबोट लागले.
कपिलेश्वर तलावावर गणपती विसर्जनाच्या ठिकाणी फक्त कन्नड भाषेतील तेही लाल-पिवळ्या रंगात फलक लावण्यात आल्याच्या मुद्द्यावरून झालेल्या गोंधळाचे गालबोट  गणेश विसर्जन कार्यक्रमाला लागले. त्यामुळे मोठा गोंधळ झाला. कार्यकर्त्यांनी आक्षेप घेऊन फलक इतर भाषेत का लावला नाही? असा सवाल महानगरपालिकेच्या अधिकारी लक्ष्मी निपाणीकर यांच्यासमोर उपस्थित केला. नजरचुकीने असे झाले असून यापुढे होणार नाही, असे त्यांनी सांगितले; मात्र  यावेळी झालेल्या वादावादी मुळे वातावरण चांगलेच तापले लक्ष्मी निपाणीकर यांनी या कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल करण्याच्या सूचना दिल्या.

एसीपी एन. व्ही. बरमनी व इतर पोलिस अधिकाऱ्यांनी हस्तक्षेप करून गोंधळ मिटवण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे परिस्थिती नियंत्रणात आली मात्र काही गणेशोत्सव मंडळांच्या वाहनां समोर कार्यकर्त्‍यांचा जल्‍लोष उत्साही वातावरणात सुरू होता त्यामुळे मिरवणुकीस विलंब लागत आहे असे कारण पुढे करून पोलिसांनी कार्यकर्त्यांना ढकलण्याचा प्रयत्न केला यामध्ये पुन्हा वादावादीचे प्रकार घडले. तसेच  विसर्जनाच्या ठिकाणी कोणताही अनुचित प्रकार घडू नयेत म्हणून सौम्य लाठीमार करून कार्यकर्त्यांना पांगवण्याचा प्रयत्न झाला .  यामध्ये कार्यकर्त्यांची चांगलीच पळापळ झाली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *