बेळगाव प्रतिनिधी
वैभवशाली गणेशोत्सवाची परंपरा चालविणाऱ्या बेळगावकरांनी श्री विसर्जन सोहळा शांततेत पार पडला. रविवारी सकाळी आठ वाजता सुरू झालेल्या या सोहळ्याची सांगता सोमवारी सकाळी सहा वाजता झाली. तब्बल वीस तास हा सोहळा सुरू होता. काही अपवाद वगळता शांततेत हा उत्साहाचा सोहळा पार पडला.
गणेशभक्तांनी रविवारी आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप दिला. मागील दहा दिवसांपासून मुक्कामासअसलेल्या गणेशभक्तांना भक्तांनी श्रद्धा पूर्ण वातावरणात निरोप दिला. तसेच पुढच्या वर्षी लवकर येण्याचे आवाहन केले. श्री विसर्जनाच्या प्रक्रियेला सकाळपासूनच सुरुवात झाली होती कोरोनाच्या निर्बंधांमुळे श्री विसर्जनाची मिरवणूक यावर्षी निघाली नाही . मात्र भक्तांनी आपल्या श्रद्धा भावनेने पारंपारिक पद्धतीने बाप्पांना निरोप देण्यासाठी भर दिला होता. सकाळपासूनच सार्वजनिक श्री विसर्जन ठिकाणी भक्तांची गर्दी सुरू झाली होती. श्री कपिलेश्वर तलाव ,श्री रामेश्वर तीर्थ, किल्ला तालाव, अनगोळ तलाव , यासह अनेक ठिकाणी असणाऱ्या सार्वजनिक तलावांमध्ये आणि विहिरी मध्ये श्रींचे विसर्जन झाले. त्याच बरोबर महानगरपालिका आणि प्रदूषण नियंत्रण मंडळाने केलेल्या सोयी नुसार सार्वजनिक फिरत्या विसर्जन कुंडामध्ये देखील विसर्जन करण्यात आले. भक्तांचा उत्साह ओसंडून वाहतात गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या असे आवाहन करीत बालचमू बाप्पांना निरोप देताना दिसून येत होता, बेळगाव शहरासह तालुक्यात विविध ठिकाणी देखील गणपती बाप्पांना निरोप देण्यात आला. बेळगाव तालुका परिसरातील भक्तांनी मार्कंडेय नदीकिनारी श्री मूर्तींचे विसर्जन केले. गणेश भक्तांनी बाप्पांना निरोप देतांना पुढच्या वर्षी कोरोनाचे संकट निवारण करण्याचे साकडे घातले
बाप्पांच्या विसर्जनासाठी प्रशासनाने पूर्ण व्यवस्था केलेली होती .महानगरपालिकेच्या यंत्रणेकडून विसर्जनाची प्रक्रिया सुरळीत पार पडावी यासाठी विशेष परिश्रम घेण्याt येत होते. कपिलेश्वर तलाव या ठिकाणी क्रेनची व्यवस्था करून विसर्जन करण्यात आले.