तयारीला लागा …स्मार्ट न्यूज नवरात्री क्विन स्पर्धा भेटीसाठी येत आहे

बेळगाव :  प्रतिनिधी

अल्पावधीत वाचकाभिमुख सेवा देऊन लोकप्रिय बनलेल्या स्मार्टन्यूजने  महिला  वाचक वर्गासाठी स्मार्ट न्यूज नवरात्री क्वीन या  विशेष स्पर्धेचे आयोजन केले आहे . यावर्षीचे आगळे वैशिष्ट्य म्हणजे या स्पर्धेचे व्हिडिओ रूपातील सादरीकरण स्मार्टन्यूज चॅनल वरून प्रसारित होणार आहे . त्यामुळे महिला समूहांना त्यांचे व्हिडिओ चॅनलच्या माध्यमातून प्रसारित करण्याची संधी मिळणार आहे.
याचा लाभ घेऊन महिला वर्गाने या स्पर्धेत मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन करण्यात येत आहे.
नवरात्रीच्या नऊ रंगांमध्ये आपल्या वेशभूषा  सादर करून महिलांनी आपल्या समूहाचे व्हिडिओ आणि छायाचित्रे व्हाट्सअप च्या माध्यमातून पाठवायची आहेत. या सर्व छायाचित्रांना स्मार्ट न्यूज’च्या ई पेपर न्युज चॅनेल यासह सर्व सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रसिद्धी देण्यात येणार आहे. या स्पर्धेच्या माध्यमातून महिलावर्गाला आपल्या कल्पकतेचा अविष्कार घडविण्याची संधी आहे. सर्व महिला सदस्यांना नऊ दिवस वेगवेगळ्या रंगांमधील आपले व्हिडिओ आणि छायाचित्रे  पाठविता येणार आहेत. या बद्दलचा तपशील दैनंदिन स्वरूपात प्रसिद्ध होत राहणार आहे. याची नोंद घ्यावी असे   आवाहन करण्यात येत आहे.
नऊ दिवसांमध्ये कोणत्या रंगाचा पेहराव असणार आहे याचा तपशील देखील दैनंदिन स्वरूपात देण्यात येणार आहे.महिलांच्या समूहांमध्ये किमान चार आणि कमाल दहा सदस्यांचा समावेश असणे आवश्यक आहे.  या स्पर्धेतील विजेत्यांसाठी आकर्षक बक्षिसे देण्यात येणार आहेत.
अधिक माहितीसाठी स्पर्धा समन्वयक भूमिका बाजीकर (9880812528)आणि पूजा मालशेट  (98866 75219) यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात येत  आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *