जागतिक स्तनपान सप्ताहानिमित्त डॉ.दत्तप्रसाद गिजरे यांचे व्याख्यान संपन्न

बेळगाव प्रतिनिधी

दि.१ ऑगस्ट ते ७ ऑगस्ट हा जागतिक स्तनपान सप्ताह म्हणून आचरला जातो.यानिमित्ताने आज सोमवारी महिला विद्यालयात गिझरे मेटर्निटी हॉस्पिटल तर्फे बेळगावचे सुप्रसिद्ध प्रसूतीतज्ञ डॉ.दत्तप्रसाद गिजरे यांचे स्तनपान आणि मातेच्या दुधाचे महत्व याविषयी व्याख्यान आयोजित करण्यात आले   होते.  कार्यक्रमाच्या व्यासपीठावर डॉक्टर दत्तप्रसाद यांच्यासह श्रीकांत काकतीकर, मंजुषा गिजरे, वैशाली स्टोन क्रेशर च्या संचालिका रुक्मिणी निलजकर,तारांगण कार्यकारी प्रमुख अरुण गोजे-पाटील उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या प्रारंभी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते कुंडीतील झाडाला पाणी घालून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.अरुणा गोजे-पाटील यांनी प्रास्ताविक केले. रोशनी हुंदरे आणि अस्मिता आळतेकर यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. कार्यक्रमाच्या अखेरीस नेत्रा मेणसे यांनी आभार मानले.
  उपस्थित महिलांच्या शंकांचे निरसन ही त्यांनी यावेळी केले.  यावेळी  निर्भिड पत्रकारिता आणि कोरोना काळातील उल्लेखनीय कार्याबद्दल डॉ. गिजरे यांनी पत्रकार श्रीकांत काकतीकर यांचा शाल, स्मृतिचिन्ह,भेटवस्तू आणि झाडाचे रोप देऊन विशेष सन्मान केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *