भाजपा खानापूर मंडळची आरोग्य स्वयंसेवक अभियान बैठक संपन्न


खानापूर प्रतिनिधी
खानापूर तालुका भाजपा खानापूर मंडळाची आरोग्य स्वयंसेवक अभियान बैठक खानापूर येथील शिवस्मारकात शुक्रवारी पार पडली.
अभियान बैठकीचा शुभारंभ द्वीप प्रजवलाने झाली, यावेळी आरोग्य स्वयंसेवक अभियान प्रमुख किरण यळ्ळुरकर यांनी पाहुण्यांचे स्वागत केले.
संपूर्ण तालुक्यात कोरोना संकटाकाळी रुग्ण सेवा तत्परतेने होण्यासाठी स्वयंसेवक तयार असावेत या दृष्टि ने कार्यशाळा मार्गदर्शन बेळगावी आरोग्य संघटन प्रमुख डॉ सोनाली सरनोबत यानी केले.
तसेच तालुका भाजपाअध्यक्ष संजय कुबल, भाजप नेते विट्ठल हलगेकर , जिल्हा भाजपा उपाध्यक्ष प्रमोद कोचेरी, डॉ संजय कुलकर्णी यांनी योग्य मार्गदर्शन केले.
यावेळी व्यासपीठावर जिल्हा सामाजिक माध्यम संचालक संतोष पाटील , सह संचालक नितिन चौगुले,जिल्हा सेक्रेटरी सौ वासंती बडीगेर, श्रीबसवराज सानिकोप, गूंडू तोपिनकट्टी ,सुनील मडीमनी, श्री प्रदीप साणिकोप,सुनील नायक होते.
कार्याक्माला राज्य वन निगम संचालक सुरेश देसाई,राजेद्र रायका, सयाजी पाटील, माजी जिल्हा पंचायत सदस्य लक्ष्मण बामणे, सचीव मारूती पाटील,लक्ष्मण झाजरें, अशोक देसाई, रमेश पाटील व इतर पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सूत्र संचालन वसंत देसाई.
यानी केले.आभार प्रदीप साणीकोप यानी मानले.
या वेळी सर्व पदाधिकारी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *