माजी ज्येष्ठ फुटबॉलपटू मेलविन उर्फ मालू परेरा याचे निधन

बेळगाव प्रतिनिधी-मूळचे केम्पं बेळगाव मधील ,सध्या गोवा राज्यातील मडगाव ,बाणावली बीच येथील रहिवासी मेलविन उर्फ मालू परेरा वय (५५) यांचे शुक्रवार दिनांक 27 रोजी अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात आई आहेत. मेलविन उर्फ मालू परेरा यांचे भाऊ , माजी फुटबॉलपटू बेनाल्ड परेरा आणि रॉय परेरा यांचे त्यापूर्वीच निधन झाले आहे. मेलविन परेरा हा सेंट पॉल हायस्कूलच्या प्राथमिक व माध्यमिक शालेय फुटबॉल संघातून रायस्टन गोम्स स्मृती फुटबॉल चषक आणि फादर एडी स्मृती फुटबॉल चषक स्पर्धा खेळल्या होत्या. गोगटे कॉलेज ऑफ कॉमर्स बेळगाव महाविद्यालयीन फुटबॉल संघातून धारवाड विद्यापीठाच्या अनेक वर्षे फुटबॉल स्पर्धा खेळल्या होत्या. बेळगाव जिल्हा फुटबॉल संघटनेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या वरिष्ठांच्या फुटबॉल स्पर्धेत मेलविन परेरा सी.वाय.एम. क्लबमधून त्यांनी अनेक स्पर्धा खेळला होता. मेलविन परेराच्या निधनामुळे बेळगावातील आनेक फुटबॉलपटूनी हळहळ व्यक्त केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *