कर्नाटक चॅम्पियन चिंटू गाडीकोप्प यांचे निधन


बेळगाव : क्रीडा प्रतिनिधी


खानापूर तालुक्यातील गाडीकोप गावचा सुपुत्र आणि महाराष्ट्र व कर्नाटक या राज्यात प्रांतात कुस्तीक्षेत्रात खानापूर तालुक्याचा झेंडा फडकविणारे, प्रख्यात पैलवान आणि कर्नाटक चॅम्पियन चिंटू गाडीकोप्प (वय 68) यांचे रविवारी महाराष्ट्र राज्यातील नगर जिल्ह्यात आकस्मीक निधन झाले. त्यांच्या पश्चात मुलगी, जावई आणि नातवंडेे असा परिवार आहे. त्यांच्या कुस्ती क्षेत्रातील प्रभावी कामगीरी बद्दल कर्नाटक सरकारने कर्नाटकचा हुली (वाघ) ही पदवी दिली होती. त्याच प्रमाणे सरकारकडून त्यांना प्रतिमहिना मानधन देण्यात येत होते. त्यांच्या निधनामुळे कर्नाटकसह महाराष्ट्र आणि बेळगाव जिल्ह्या कुुुस्तीगीर संघटना आणि तालुका कुस्तीगीर संघटना व उदयोन्मुख पैलवानांनी त्यांना श्रध्दांजली वाहीली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *