गोजगे येथे शेतकऱ्याची आत्महत्या

गोजगे येथे शेतकऱ्याची आत्महत्या

बेळगाव

आर्थिक संकटामुळे खचलेल्या शेतकऱ्याने झाडाला गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना बेळगाव तालुक्यातील गोजगे येथे घडली आहे.या घटनेमुळे संपूर्ण पंचक्रोशीवर शोककळा पसरली आहे.
अशोक कृष्णा बामणे (वय 59 राहणार कलमेश्वर गल्ली, गोजगे ) असे या दुर्दैवी शेतकऱ्याचे नाव आहे. अलीकडेच त्यांनी शेतीमध्ये बटाट्याचे बियाणे पेरले होते. मात्र नुकत्याच झालेल्या पावसामध्ये बियाणे कुजल्यानंतर तो मानसिक दृष्ट्या खचला होता .आपले मोठे आर्थिक नुकसान झाल्याची भावना त्याला त्रस्त करत होती. त्यामधूनच आलेल्या नैराश्यातून त्याने झाडाला गळफास लावून घेऊन आत्महत्या केल्याची माहिती पोलिस सूत्रांनी दिली. सदर घटना शनिवारी सकाळी उघडकीस आली.
मयत अशोक बामणे हे गावांमधील विविध सामाजिक क्षेत्रातील कार्यरत असणारे व्यक्तिमत्त्व होते. त्यांच्या आत्महत्येमुळे गोजगे गावासह संपूर्ण तालुक्यातून हळहळ व्यक्त होत आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *