शनिवारच्या कोंबडी बाजाराला ग्राहकांचा प्रतिसाद

बेळगाव

लॉक डाऊन नंतरच्या कालावधीत शनिवारच्या बाजारपेठेला बहर येत आहे. त्यामुळे बेळगाव तालुक्याच्या भागातून कोंबडी बाजार देखील नियमित भरू लागला आहे .
नागरिकांकडून कोंबडी खरेदीला उत्साह दिसून येऊ लागला आहे. शनिवारच्या बाजारपेठेत कोंबड्यांचा दर 150 ते 500 रुपयांपर्यंत राहिला आहे.शहरी भागातील चिकन प्रेमींसाठी ही एक पर्वणी ठरते आहे.

कोरोनाच्या परिस्थितीमुळे या वर्षीच्या वर्षीच्या जत्रा आणि यात्रा रद्द झाल्या. परिणामी या जत्रा यात्रांच्या निमित्ताने होणारी कोंबडी खरेदी कमी झाली. शेतकरी आपल्या कडे असणाऱ्या कुक्कुट पालन केलेल्या कोंबड्या विक्रीसाठी बाजारात घेऊन येतात. शेतकऱ्यांसाठी पूरक उद्योग असणारा हा व्यवसाय पुन्हा कधी तेजीत येणार याची प्रतिक्षा शेतकरी वर्गाला लागून राहिली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *