दि. २१ जून ग्रहण माहिती

दि. २१ जून ग्रहण माहिती

रविवारी २१ जून (जेष्ठ अमावस्या)या दिवशी कंकणाकृती सूर्यग्रहण आहे.
यादिवशी चे नियम पुढीलप्रमाणे-

वेध काळ- शनिवारी २० जून रात्री १० वाजले पासून सुरू होतो आहे ते दुसऱ्या दिवशी रविवारी २१ जून ला दुपारी १:२८ पर्यंत म्हणजे ग्रहण संपेपर्यंत.

गर्भवती स्त्रियांसाठी पाळावयाची वेळ-
गर्भवती स्त्रियांनी रविवारी २१ जून रोजी पहाटे 4:45 पासून ग्रहण संपेपर्यंत म्हणजे दुपारी 1:28 पर्यंत ग्रहण पाळावे.

ग्रहणकाळ-
रविवारी २१ जून रोजी सकाळी १० वाजलेपासून ते दुपारी १:२८ पर्यंत

ग्रहण नियम-
वेधामध्ये जेवण करू नये, स्नान , जप, नित्यकर्म, देवपूजा, श्राद्ध ही कर्मे करता येतात.
वेधकाळात आवश्यक असे पाणी पिणे, शौचास व लघवीस, झोप इत्यादी कर्मे करता येतात.

ग्रहण पर्व काळात मात्र(सकाळी 10 ते 1:28 मध्ये)पाणी पिणे, शौचास व लघवीस जाणे आणि झोपणे ही कर्मे करू नयेत.गर्भवती स्त्रियांनी ग्रहण पाहू नये.

ग्रहणातील कर्मे-
ग्रहण स्पर्श होताच स्नान करावे.
पर्वकाळात देवपूजा, तर्पण, श्राद्ध,जप,होम,दान करावे.

जेष्ठ अमावास्येच्या या ग्रहणामध्ये अधिकाधिक पाठ करण्याला प्राधान्य द्यावे. ग्रहण काळात केल्या गेलेल्या जपाचा १०० पट इतका जप ग्राह्य धरला जातो. ग्रहणकाळात आपण आपल्या गुरूंनी दिलेल्या मंत्राचा जप करावा, किंवा आपल्या कुलदेवतेचा किंवा आपल्या आवडत्या देवाचा जप करावा, अगदी काहीच सुचत नसेल तर दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा असा जप करावा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *