माहिती आयोगाचे कार्यालय बेळगाव सुरू

 

बेळगाव 
राज्य माहिती आयोगाच्या कार्यालयाचा कार्यारंभ सुवर्ण विधान सौध मध्ये करण्यात आला आहे. सुवर्ण विधानसौध येथे राज्य सरकारची विविध कार्यालय सुरू करण्याच्या टप्प्यातील हे पहिले पाऊल असून राज्य सरकारकडून याचा कार्यारंभ झाला आहे. दि. 22 जून पासून प्रत्यक्ष कामकाजाला प्रारंभ होणार करण्यात येणार आहे.या संदर्भातील माहिती राज्य माहिती आयुक्त बी.व्ही. गीता यांनी पत्रकार परिषदेत दिली. राज्याचे मुख्यमंत्री बी. एस .येडियुरप्पा यांनी घोषणा केल्यानुसार सुवर्ण विधानसौध येथे सरकारी कार्यालयांचे स्थलांतर करण्याचे निश्चित झाले होते. दि. 3 मार्चपासून माहिती आयोगाचे कार्यालय या ठिकाणी सुरू होणे अपेक्षित होते. मात्र कोरोनाच्या कालावधीनंतर याचा कार्यक्रम करण्यात आलेला आहे. या आयुक्तालयाच्या कक्षेत बेळगाव सह राज्यातील एकूण सात जिल्ह्यांचा कारभार चालणार आहे. त्यामध्ये विजयपूर, धारवाड, गदग, हावेरी, बागलकोट आणि उत्तर कन्नड या जिल्ह्यांचा समावेश आहे. माहिती आयुक्त यांच्यासमोर सध्या एकूण चार हजाराहून अधिक प्रकरणे प्रलंबित असून ती निकाली काढण्यासाठी यापुढे कामकाज करण्यात येईल. अशी माहिती गीता यांनी दिली.
 
 

योगसाधना ही जीवनपद्धती बनवा.

बेळगाव
 योगाभ्यास ही भारताने जगाला दिलेली एक मोठी देणगी आहे .त्यामुळे आज जगभरात योगसाधनेचा पुरस्कार सुरू आहे. अनेक विकारांवर मात करण्याबरोबरच एक जीवन पद्धती म्हणून याचा स्वीकार करणे योग्य ठरेल असे विचार आयुर्वेद आणि योग्य शाळेचे संचालक डॉ. रुपेश साळुंखे यांनी स्मार्ट न्यूज प्रतिनिधीशी बोलताना व्यक्त केले. जागतिक योग दिनाच्या पूर्वसंध्येला त्यांच्याशी बातचीत केली असता त्यांनी याबाबत माहिती दिली. तसेच योगाभ्यासाचे महत्त्व कथन केले.

पूजा पाठापासून अंतिमसंस्कारा पर्यंत सर्व सेवा.... महिला पुरोहित भारतीचा आगळा प्रवास आज स्त्रिया पुरुषांच्या बरोबरीने ही सर्व क्षेत्रात कार्यरत आहेत,असे म्हटले जाते.तरी देखील आजच्या समाजासमोर स्त्रियांनी पौरोहित्य करावे की नाही हा प्रश्न नेहमीच वादाचा विषय ठरू शकतो. मात्र या सगळ्यात वादाच्या कोणत्याही भोवऱ्यात न सापडता आपण निवडलेला मार्ग चालत राहण्याची कामगिरी बेळगावातील एक महिला करीत आहे. पौरोहित्य करीत पूजा पाठापासून थेट अंतिम संस्कारापर्यंतचे सारे धार्मिक विधी करणारी ही राज्यातील एकमेव महिला पुरोहित नुसत्याच कौतुकाला नव्हे, तर समाजाच्या आदराला पात्र ठरली आहे. स्मार्ट न्यूज च्या माध्यमातून या पुरोहित महिलेचे कर्तुत्व जनतेसमोर आणण्याचे कार्य आम्ही करत आहोत.

बेळगाव

महानगरपालिकेच्या कार्यालयांमध्ये सामान्य नागरिकांना प्रवेश बंद करण्यात आला आहे . मात्र तातडीच्या कामासाठी मनपामध्ये येणाऱ्या नागरिकांना पूर्ण काटेकोर तपासणी करून त्यांचे अर्ज बाहेरील बाजूस स्वीकारण्यात येत आहेत. चौदा दिवसांसाठी ही परिस्थिती लागू राहणार असल्याचे उपायुक्त के.एच. जगदीश यांनी जाहीर केले आहे. कोणत्या विभागात काम व्हावयाचे आहे याचा पूर्ण तपशील नागरिकांना सादर करणे आवश्यक बनले आहे. महानगरपालिकेच्या दैनंदिन स्वरूपात नागरिक विविध कामासाठी महानगरपालिकेला येत असतात. यामध्ये जन्म आणि मृत्यू नोंद करण्यासाठी नागरिकांची वर्दळ मोठी असते. नागरिकांना जन्म आणि मृत्यूची नोंद करण्यासाठी ची सुविधा कार्यालया बाहेरच्या बाजूस करून देण्यात आली आहे. त्यासाठी नागरिकांची गर्दी आता महानगरपालिकेच्या आवारात दिसून येत आहे. महानगरपालिकेच्या प्रवेश द्वारासमोर एक विशेष कक्ष निर्माण करून नागरिकांची संपूर्ण तपासणी करण्यात येत आहे. त्यांच्याकडून त्यांचा तपशील पूर्ण स्वरूपात नोंदवून घेण्यात येत आहे.

बेळगाव

पावसाळ्यात पर्यटकांचे आकर्षण असणारा सुप्रसिद्ध गोकाकचा धबधबा आता भरून वाहू लागला आहे. कोरोनाच्या संकट छायेमुळे यावर्षी या धबधब्याचे दर्शन घेण्यासाठी पर्यटकांची गर्दी मात्र ओसरली आहे. बेळगाव जिल्ह्यातील सुप्रसिद्ध असा होता हे पर्यटकांसाठी मोठे आकर्षणाचे केंद्रबिंदू आहे. या दर्शन घेण्यासाठी बेळगाव जिल्ह्यासह आसपासच्या अनेक राज्यांमधून पर्यटक या ठिकाणी येत असतात. धबधबा पाहण्याबरोबरच येथील सुप्रसिद्ध अशा करदंटचा आस्वाद घेण्यासाठी देखील पर्यटकांचा ओघ असतो. मात्र यावर्षी हा ओघ नसल्यामुळे येथील व्यावसायिक वर्गदेखील चिंतातुर झालेला आहे. बेळगाव जिल्ह्यातील महत्वाचे पर्यटन स्थळ असणाऱ्या या धबधब्याचे दर्शन सध्या स्थानिक नागरिक घेत आहेत. परंतु बाहेरगावाहून येणाऱ्या पर्यटकांची मात्र येथे उपस्थिती नाही. दरवर्षीच्या मोसमात येथे पर्यटकांची रीघ लागलेली असते. लांबवरून गाड्या करून येणाऱ्या पर्यटकांमुळे येथे उद्योगाची देखील चलती असते. हॉटेल्स आणि छोटे व्यावसायिक यांना ही पर्वणी असते. मात्र यावर्षी या साऱ्यांवर संकट ओढवले आहे.

बेळगाव
कोरोनाच्या संदर्भात नवीन नियमावली दिनांक ८ जुलैपासून लागू करण्यात आली आहे. त्यानुसार परराज्यातून येणाऱ्या नागरिकांना. चौदा दिवसाचे होम क्वारंटाईन राहणार आहे .या दृष्टीने आरोग्य खात्याने विशेष पावले उचलावीत आणि कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी कटिबद्ध व्हावे अशी सूचना जिल्ह्याचे पालकमंत्री रमेश जारकीहोळी यांनी केली. येथील जिल्हा पंचायत सभागृहात झालेल्या बैठकीत त्यांनी याविषयी मार्गदर्शन केले.परराज्यातून येणाऱ्या नागरिकांवर करडी नजर ठेवून योग्य व्यवस्थापन करण्याच्या दृष्टीने आरोग्य खात्याने सज्ज व्हावे,अशी सूचना त्यांनी केली. तसेच राज्य सरकारने कोरोना रुग्णांसाठी आवश्यक वैद्यकीय सेवा आणि व्हेंटिलेटर पुरवण्याच्या दृष्टीने उपलब्ध करून दिलेल्या सुविधांची माहिती त्यांनी दिली. यावेळी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री सुरेश अंगडी,राज्याच्या महिला बालकल्याण मंत्री शशिकला जोल्ले, खासदार आण्णासाहेब जोल्ले, आ. महांतेश कवटगीमठ, आ. अनिल बेनके, आ. पी. राजीव, जिल्हा पंचायतीच्या अध्यक्षा आशा ऐहोळे, उपाध्यक्ष अरुण कटांबळे, जिल्हाधिकारी एम.जी . हिरेमठ, पोलीस आयुक्त डॉ. के त्यागराजन, जि. पं. चे सीईओ डॉ.के. व्ही. राजेंद्र, जिल्हा पोलीसप्रमुख लक्ष्मण निम्बर्गी आदी उपस्थित होते.
 
 
You cannot copy content of this page
error: Content is protected !!