माजी आमदारांच्या वक्तव्यामुळे उठले वादळ

बेळगाव प्रतिनिधी

बेळगाव भाजप जिल्हा ग्रामीणचे अध्यक्ष माजी आ. संजय पाटील यांनी केलेल्या वक्तव्याचे पडसाद उमटले आहेत .त्यांनी एकाच वेळी दोन बेताल वक्तव्य करून साऱ्यांचाच रोष ओढवून घेतला आहे. त्यामुळे ते पुन्हा एकदा वादग्रस्त ठरले आहेत. एकीकडे त्यांनी मराठी भाषिकांना दुखावणारे वक्तव्य केले आहे . तर दुसरीकडे काँग्रेसच्या लक्ष्मी हेब्बाळकर यांच्यावर यांच्या संदर्भात देखील निराधार स्वरूपाचे वक्तव्य करून नामुष्की ओढवून घेतली आहे. त्यामुळे आ. संजय पाटील हे आता वादाचे केंद्रबिंदू बनले आहेत.

बेळगाव तालुक्यात काही ठिकाणी लावण्यात आलेले बॅनर फलक हे मराठी भाषिकांनी लावले आहेत. असा आरोप करून त्यांनी मराठी भाषिकांच्या भावना दुखावल्या आहेत. या त्यांच्या वक्तव्याचा व्हिडिओ व्हायरल झाला असून सोशल मीडियाने त्यांच्यावर तोफ डागली आहे. त्यामुळे त्यांच्या विरोधात तीव्र नाराजीची लाट उमटली आहे .तर दुसरीकडे त्यांनी लक्ष्मी हेब्बाळकर या नाईट कल्चर मधून राजकारणी बनल्या आहेत असे म्हणून गोंधळ माजविला आहे. या प्रकारची सोशल मीडियाच्या माध्यमातून जोरदार चर्चा होत आहे. त्याचप्रमाणे ठिकाणी याचा जोरदार निषेध होऊ लागला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *