नवी दिल्ली वृत्तसंस्था
गेल्या तीन दिवसांपासून सातत्याने पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतींमध्ये वाढ होताना दिसत आहे. शनिवारी देखील पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती देशभर वाढलेल्या दिसून आल्या. देशातील मोठ्या शहरांमध्ये नोंद करण्यात आलेल्या पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती शंभरीपार गेल्या. त्यामुळे आज देशातील अनेक शहरांमध्ये पेट्रोलच्या किंमती सर्वाधिक झाल्याची देखील नोंद करण्यात आली आहे.
राजधानी दिल्लीमध्ये आज पेट्रोलच्या किंमती प्रतिलीटर १०२ रुपये १४ पैसे इतकी झाली आहे. आर्थिक राजधानी मुंबईत हाच आकडा १०८ रुपये १९ पैसे प्रतिलीटर इतका वाढला आहे. त्याचवेळी या दोन्ही राजधान्यांमध्ये डिझेल्या किंमती अनुक्रमे ९० रुपये ४७ पैसे आणि ९८ रुपये १६ पैसे इतकी झाली आहे. कोलकात्यामध्ये देखील पेट्रोलनं केव्हाच शंभरी गाठली आहे. त्याचप्रमाणे लहान मोठ्या शहरांमध्ये पेट्रोल आणि डिझेलची दरवाढ सातत्याने सुरू आहे.