क्रेडाईच्या वतीने लसीकरण शिबिर संपन्न

बेळगाव प्रतिनिधी

क्रेडाई बेळगाव संस्थेच्या वतीने बांधकाम क्षेत्रातील सदस्य आणि कामगारांच्या कुटुंबीयांसाठी लसीकरण शिबिर नुकतेच घेण्यात आले . मंगळवार पेठ टिळकवाडी येथील क्रिशनेस्ट प्रकल्पाच्या ठिकाणी या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी संघटनेचे अध्यक्ष पंचाक्षरी हिरेमठ, राजेश हेडा, राजेंद्र मुतगेकर , सचिन कळीमनी , विजय भंडारी, युवराज हुलजी, अमर अकणोजी, गोपाळ कुकडोळकर, आनंद अकणोजी, प्रशांत वांडकर आणि इतर सदस्य उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *