खानापूर वनसंपदेला वन महामंडळाच्या संचालकांची भेट


खानापूर प्रतिनिधी


खानापूर तालुक्यातील वनसंपदेची पाहणी करण्यासाठी राज्य वननिगमच्या संचालकानी नुकतीच भेट देऊन पाहणी केली.
राज्यातून वननिगमच्या संचालकाचा अभ्यास दौरा सुरू आहे. नुकताच खानापूर तालुक्यातील वनसंपदेची पाहणी करण्यात आली. या दौऱ्यात वन निगमाचे संचालक सुरेश देसाई, त्याच्यासोबत राज्य गोपाल, भागा आरेश, प्रदिप कुमार, वनाधिकारी हनमंत राजू, गिरीश इटगी आदीचा समावेश होता.
यावेळी राज्यातील वनसंपदेची माहिती व्हावी. वृक्ष लागवडीसाठी सुरू असलेल्या उपक्रमांचा आढावा घेण्यात यावा. हा या दौऱ्यामागचा उद्देश आहे.
या दौऱ्यात खानापूर सह यल्लापूर, शिरसी, दांडेली, जोग, सागर, शिमोगा, चिकमगळूर, मुडकेरी, बेंगळुर आदी भागातील रोप वाटीका, वृक्षवाटीकाना भेटी देण्यात आल्या.
तसेच चंदन, सागवान, बाबू लागवडीच्या क्षेत्राची पाहणी करण्यात येत आहे
याशिवाय जंगल क्षेत्राचा विकास व विस्तार याबदल संचालकाना माहिती देण्यात येणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *