सणासुदीच्या दिवसात …सोने पडणार महागात

बेळगाव प्रतिनिधी

गेले काही दिवस सातत्याने उतरणारे सोने पुन्हा वधारले. सोन्याच्या किमतीत ₹ 700 रुपयांनी वाढ होऊन ते प्रति तोळा ₹ 47900 रुपये झाले. सोन्यासोबतच देशात चांदीचे भावही ₹ 500 रुपये प्रति किलो वाढल्याचं दिसून आलं. चांदीचा दर ₹ 60800 रुपये प्रति किलो इतका झाला.

जागतिक बाजारपेठेत सोन्याच्या किमती वाढल्याने देशांतर्गत बाजारपेठेतही सोन्याचे दर वाढले. सणासुदीचे दिवस असल्याने सोन्याचे दर आता घसरण्याची शक्यता कमी असल्याचे तज्ञांचे म्हणणे आहे. डिसेंबरपर्यंत ते तोळ्याला 52 हजार रुपयांवर जाईल, अशीही शक्यता त्यांनी व्यक्त केली.

दिवाळी ते डिसेंबरपर्यंत सोन्याची किंमत 52 हजारांच्या पुढे जाण्याची शक्यता
दिवाळी ते डिसेंबर पर्यंत सोन्याची किंमत 50000 ते 52000 रुपयांपर्यंत जाऊ शकते. म्हणजेच आता जे भाव चालू आहेत ते वाढू शकतात. जोपर्यंत चांदीचा प्रश्न आहे, त्यातही मोठी वाढ होऊ शकते. बहुतेक व्यापाऱ्यांचा असा विश्वास आहे की दिवाळीपर्यंत किंवा वर्षाच्या अखेरीपर्यंत चांदीचे दर 62000 ते 65000 रुपये प्रति किलोपर्यंत जाऊ शकतात. असा अंदाज काही व्यापाऱ्यांनी व्यक्त केला

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *