पंतप्रधानांना पत्र मोहिमेत मुंबईच्या महापौर किशोर पेडणेकर यांचाही सहभाग

मुंबई :  वृत्तसंस्था


सीमाप्रश्‍नी पंतप्रधानांचे लक्ष वेधण्यासाठी खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीतर्फे हाती घेण्यात आलेल्या पत्र पाठविण्याच्या मोहिमेला बेळगाव शहर, तालुक, जिल्हा आणि सीमा भागातून प्रचंड प्रतिसाद मिळाला आहे. सीमावासीयांनी हाती घेतलेल्या या मोहिमेला महाराष्ट्रातील मान्यवरांनीही उस्फुर्त पाठिंबा दर्शविला आहे. मुंबईच्या महापौर किशोरीताई पेडणेकर यांनीही सीमाप्रश्नी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र पाठवताना सीमाभागातील तमाम मराठी भाषिकांच्या विषयी आपली आत्मियता व्यक्त केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *