ज्येष्ठ आणि अष्टपैलू क्रिकेटपटू मिलिंद कुलकर्णी यांचे निधन

बेळगाव किडा प्रतिनिधी-मूळचे बेळगावचे आणि सध्या केशवपुर हुबळी येथील रहिवासी आणि अष्टपैलू क्रिकेटपटू मिलिंद भास्कर कुलकर्णी वय (६१) यांचे शुक्रवार दिनांक 28 रोजी अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, एक विवाहित मुलगी ,जावई, मुलगा ,एक भाऊ असा परिवार आहे. मिलिंद कुलकर्णी यांचे शालेय शिक्षण ठळकवाडी हायस्कूल येथे झाले. क्रिकेट खेळायला ठळकवाडी स्कूल मधून त्यांनी सुरुवात केली. आरपीडी महाविद्यालय आणि लिंगराज महाविद्यालयातून क्रिकेट संघात त्यांनी अष्टपैलू खेळी केली. धारवाड विद्यापीठ क्रिकेट संघातून त्यांनी अनेक स्पर्धा गाजविल्या. मिलिंद कुलकर्णी यांनी गोव्याच्या चौगुले कंपनी मधील अर्लेम क्रिकेट क्लब मधून त्यांनी अखिल भारतीय अर्लेम क्रिकेट स्पर्धा आणि मुंबईतील टाइम्स ऑफ इंडिया चषक क्रिकेट स्पर्धेत त्यांनी भाग घेतला होता. युनियन जिमखाना आणि आरपीडी महाविद्यालयाच्या मैदानावर अनेक शतके नोंदविली होती. डिग्वेल क्रिकेट क्लब आणि केजीबी या नामवंत क्रिकेट संघातून त्यांनी टेनिस क्रिकेट स्पर्धा गाजविला. यांच्या दुःखद निधन मुळे बेळगावातीलअनेक मित्र परिवार यांनी हळहळ व्यक्त केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *