कावळेवाडीच्या प्रेम बुरुड ला मिळाला मदतीचा हात…..

बेळगाव प्रतिनिधी

येथील फेसबुक फ्रेंड सर्कल चे अध्यक्ष संतोष दरेकर व त्यांचे मित्र वाय.पी.नाईक, राहुल पाटील, प्रमोद शर्मा हे बेळवटी गावी जात असताना कावळे वाडी गावचा धावपटू कु.प्रेम बुरुड हा धावण्याचा सराव करत होता .वाय.पी.नाईक यांनी हा गावातील छोटा धावपटू रोज या ठिकाणी सराव करत असल्याचे सांगितले.त्यावेळी लागलिच गाडी थांबवून चौकशी केली असता त्याचे वडील यलापा बुरूड यांनी आपल्या मुलाची माहिती दिली . गेल्या चार वर्षांत प्रेमने विविध ठिकाणी मॅरेथॉन स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावला आहे असे सांगून, प्रतिकुल, खडतर परिस्थितीत एक मोठी जिद्द, चिकाटी ठेवून मुलांसाठी धडपडत असल्याचे सांगितले.या मुलाला प्रोत्साहन देण्यासाठी फेसबुक फ्रेंड सर्कल व पोलीस खात्याचे वरिष्ठ अधिकारी डॉ.विक्रम आमटे (डी.सी.पी.), डॉ.देवदत देसाई-श्री प्रभा हाॅसपिटल हे मदतीला धावून आले . त्याला लागलिच बेळगाव ला बोलावून चांगल्या प्रतीचे दोन जोड स्पोर्ट्स शूज , दोन जोड स्पोर्ट्स ट्रॅक , दोन जोड मोजे व एक डाएट किट देऊन प्रेरणा दिली.
डॉ.विक्रम आमटे यांनी आपल्या कार्यालयात खास त्याला बोलावून कौतुकाची थाप दिली.त्यावेळी आपल्या मुलाचं कौतुक पाहून वडील गहिवरून गेले.प्रेमने आपण भविष्यात पोलिस खात्यात काम करण्याची इच्छा व्यक्त केली.प्रेम हा कावळे वाडी प्राथमिक शाळेत पाचवीत शिकत आहे.पोलिस अधिकारीना प्रत्यक्ष भेटण्याचे स्वप्न पूर्ण झाले.. यावेळी संतोष दरेकर व वाय.पी.नाईक यांच्यामुळे संधी मिळाली अशी कृतज्ञता यलापा बुरूड यांनी व्यक्त केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *