भारताचा टी-ट्वेंटी संघाचा नवा कर्णधार रोहित शर्मा ?

मुंबई: विराट कोहलीने ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये युएईत होणाऱ्या टी-२० वर्ल्डकपनंतर भारताच्या टी-२० संघाचे नेतृत्व सोडण्याची घोषणा केली आहे. विराटने सोशल मीडियावरून ही घोषणा केली आहे. विराटच्या या निर्णयानंतर एकच चर्चा सुरू झाली आहे ती म्हणजे भारताच्या टी-२० संघाचा कर्णधार कोण असेल? या प्रश्नाचे उत्तर एकाच खेळाडूच्या नावावर जाऊन थांबते ते म्हणजे रोहित शर्मा होय.
रोहित शर्माचे आयपीएलमधील रेकॉर्ड शानदार आहे. त्याने पाच वेळा विजेतेपद मिळून दिले आहे. रोहितने मुंबई इंडियन्सला २०१३, २०१५, २०१७, २०१९ आणि २०२० मध्ये विजेतेपद मिळून दिले. या शिवाय रोहितने २०१८च्या आशिया कपमध्ये भारताला विजेतेपद मिळून दिले होते.
मैदानाबाहेर नेहमीच विराट कोहली आणि रोहित शर्मा यांच्या नेतृत्वाची चर्चा सुरू असते. आयपीएल असो की विराटच्या गैरहजेरीत रोहित जेव्हा जेव्हा वनडेत आणि टी-२० मध्ये भारताचे नेतृत्व करायचा तेव्हा तेव्हा ही चर्चा अधिक जोराने सुरू व्हायची. याचे कारण देखील तितकेच भक्कम होते, ते म्हणजे विराट पेक्षा रोहितची कामगिरी होय. विजयाच्या टक्केवारीचा विचार करता वनडेत ७०.४३ तर टी-२० मध्ये ६७.४४ अशी विराटची कामगिरी आहे. तर रोहित शर्माची टक्केवारी अनुक्रमे ८० आणि ७८.९४ इतकी आहे. या सोबत रोहितने मुंबई इंडियन्सला एक दोन नव्हे तर तब्बल पाच विजेतेपद मिळवून दिली आहेत.
कर्णधार म्हणून रोहितची कामगिरी
वनडे
सामने- १०
विजय-०८
पराभव-२
टाय-००
निकाल नाही- ००
टक्केवारी- ८०
टी-२०
सामने- १९
विजय-१५
पराभव-०४
टाय-०
निकाल नाही- ०

टक्केवारी- ७८.९४

आयपीएल
सामने-१२३
आयपीएल
सामने-१२३
विजय-७४
पराभव-४९
टाय-००
निकाल नाही-००
टक्केवारी- ६०.१६

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *